Prithviraj Chavan and PM Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : PM मोदींना भेटल्यावरच मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल, अन्यथा..; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होते.

हेमंत पवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होते; पण पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटले पाहिजे. त्यांच्यासमोर त्यासंदर्भातील योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

आमदार चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्ताने फराळाचे आयोजन केले होते. त्‍यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. चव्‍हाण म्‍हणाले, ‘‘दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले; पण पवारांचे घरातल्या घरात नेमकं काय चाललंय, हे समजत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्‍‍लेषण करणारा अजून जन्मायचा आहे.’’

तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार का? याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘‘अजून आमच्या आघाडीत कोण कोणती जागा लढवणार, हे निश्चित नाही. ते पहिल्यांदा ठरले पाहिजे. महाविकास आघाडीत जो निर्णय होईल त्यावर पुढील दिशा ठरेल.’’

वडेट्टीवारांची भूमिका वैयक्तिक

काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे. ती काँग्रेस पक्षाची भूमिका नाही, असेही चव्‍हाण यावेळी म्‍हणाले.

विरोधकांची एकजूट गरजेची

राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे; पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT