Ambadas Danve sakal
महाराष्ट्र बातम्या

Ambadas Danve: अंबादास दानवेंना निलंबनातून सूट; पाच दिवसांऐवजी...

winter session Ambadas Danve exempted from suspension: अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला होता.

संतोष कानडे

Winter Session 2024 : शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतून निलंबन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी सभापतींकडे केली होती.

सभापतींनी अंबादास दानवेंच्या निलंबनावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना निलंबनातून सूट देण्यात आलेली आहे. पाच दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांच्या निलंबनाची कारवाई दानवेंवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दानवे शुक्रवारपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेतील.

अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला होता.

दरम्यान, अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी  सलग दोन वेळा उपसभापती यांच्या दालनात बैठका पार पडल्या. एवढंच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली.

अंबादास दानवे यांनी माफीचे पत्र देखील लिहिलं होते. या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील माफी मागितली होती. यातच कारवाई करताना दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला होता. अखेर दानवेंच्या निलंबनामध्ये सूट देण्यात आलेली आहे. ते उद्यापसून पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT