ambadas danve police custody for agitation over bhagatsingh koshyari controversy statement shivaji maharaj  
महाराष्ट्र बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj: कोश्यारींच्या विधानावरून वाद पेटला! आंदोलक अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अक्षपार्ह वक्तव्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात संभाजीनगर येथे सुरू असलेल्या आंदोलनात ताब्यात असलेल्या तरुणांना सोडवण्यासाठी गेलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यभरात कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलने करण्यात येत आहेत.

कोश्यारी काय म्हणालेत?

कोश्यारी यांना तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” औरंगाबादे येथील एका कार्यक्रमात बोलताना असे वक्तव्य राज्यपालांनी केले होते, त्यानंतर त्यांचा कडाडून विरोध केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT