Amit Shah on split in Shivsena and NCP Sharad Pawar Uddhav Thackeray Lok Sabha Election  
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडले नाहीत तर... अमित शाहांचे पवार-ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत.

रोहित कणसे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. यादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायाला मिळत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रातील विदर्भात प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी आम्ही (भाजप) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले नाहीत असे शाह यांनी स्पष्ट केलं.

भंडाऱ्यातील साकोलीत झालेल्या सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणत आहेत की माझा पक्ष भाजपाने फोडला, शरद पवार देखील माझा पक्ष फोडला असे म्हणतात. मी आज स्पष्ट करतो की, आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला नाही. तर उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहानं शिवसेना फोडली तर शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला असे अमित शाह म्हणाले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, येथील एक नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले आणि काँग्रेसची परिस्थिती काय झाली. अर्धी शिवसेना आणि आर्ध्या राष्ट्रवादीने पूर्ण काँग्रेसला अर्ध करण्याचं काम केलं, असा टोला देखील अमित शाह यांनी काँग्रेसला लगावला.

तसेच तीन अर्धे पक्ष महाराष्ट्राचे भले करू शकतात का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात असा दावाही अमित शाह यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan : माझ्या वक्तव्याचा सोयीने विपर्यास केला; दहशतवादाला कोणताही जात, धर्म, रंग नसल्याचे केले स्पष्टीकरण

Kannad Crime : सख्या मामाकडून अल्पवयीन भाचीवर अत्याचार; मामाला अटक

Dadar Kabutarkhana: कबुतरखाना हटवण्याच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध, पालिकेची माघार

IND vs ENG 5th Test: यशस्वी जैस्वालचे फ्लाईंग किस, हार्ट साईन कुणासाठी? समोर आली ती व्यक्ती, सर्वांना वाटलं तो रोहित, पण... Video

इच्छेविरुद्ध पतीने घेतला घटस्फोट मग कॅन्सरपुढे तीही हरली; मृत्यूनंतर नवऱ्याने केले तिच्याच घरच्यांवर आरोप

SCROLL FOR NEXT