Amravati Graduate Constituency Result  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amravati Graduate Constituency Result : अमरावतीतही भाजपचा सुपडा साफ; मविआचे धीरज लिंगाडे विजयी

सकाळ डिजिटल टीम

Amravati Graduate Constituency Result : अमरावतीतही भाजपचा सुपडा साफ झाल्याचे समोर आले आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे.

तब्बल 30 तासानंतर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीत मविआच्या धीरज लिंगाडेंना ४६ हजार ३४४ तर, भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना केवळ ४२ हजार ९६२ मते मिळाली आहेत.

काल दुपारी धीरज लिंगाडे हे 2 हजार मते घेऊन आघाडीवर आहेत. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती.

तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेर मतमोजणी सुरू केल्याने हा निकाल रखडला गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT