Amravati Police Commissionerate first in the state in conviction 
महाराष्ट्र बातम्या

दोषसिद्धीमध्ये अमरावती पोलिस आयुक्तालय राज्यात प्रथम

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : दोषसिद्धीच्या प्रकारात अमरावती पोलिस आयुक्तालयामध्ये भरीव कामगिरी झाली. त्यामुळे राज्यातील दहा पोलिस आयुक्तालयांपैकी अमरावती पोलिस आयुक्तालय पहिल्या क्रमांकावर आले.

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) यांच्या वतीने दोषसिद्धीच्या संदर्भातील आकडेवारी जाहीर झाली. त्यामध्ये सप्टेंबर २०२० मध्ये १४ टक्के, ऑक्‍टोबर २०२० मध्ये ५० टक्के, असे अल्प प्रमाण होते. त्यात वाढ करण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी पुढाकार घेतला. पोलिस अधिकारी आणि तपासी अंमलदार यांना हे प्रमाण वाढविण्यासाठी अनेक कार्यशाळा घेतल्या, शिवाय वैयक्तिक मार्गदर्शनही केले.

नोव्हेंबर २०२० मध्ये ९३.७५ टक्के हे प्रमाण वाढले. डिसेंबर २०२० मध्ये ९० टक्के, अशी अधिक वाढ झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागानेच जाहीर केले. तपासातील कौशल्य वाढविण्यासाठी आयुक्तांसह उपायुक्त शशिकांत सातव, विक्रम साळी यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. त्यामुळे डिसेंबर २०२० अखेरीस राज्यात पोलिस आयुक्तालय दोषसिद्धीच्या प्रमाणात प्रथम क्रमांकावर आले.

तातडीने दोषारोपपत्र दाखल केले
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपास पूर्ण करून तातडीने दोषारोपपत्र दाखल केले गेले. तपासातील तांत्रिक तृट्या दूर करण्यावर भर दिला गेला. पैरवी अधिकाऱ्यांना वेळोवेळी अपडेट राहण्यास सांगितले. त्यामुळे हे यश मिळाले.
- डॉ. आरती सिंह,
पोलिस आयुक्त, अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

माधुरी दीक्षितच्या सासूसासऱ्यांना पाहिलंत का? कुठे राहतात, काय करतात श्रीराम नेने यांचे आई- वडील?

Maharashtra Drought : दुष्काळाचे विदारक चित्र ! पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाला बाजारात विकताना शेतकरी हमसून रडला, VIDEO VIRAL

'मी अनेक वर्षांपासून गहू खाल्लाचं नाही' ऐश्वर्या नारकर इतकं वय होऊनही फिट कशा? म्हणाल्या...'घरगुती डबा अन् साधा आहार'

SCROLL FOR NEXT