kishori pednekar Sakal
महाराष्ट्र बातम्या

"अशी कशी नशिबाने थट्टा मांडली"; अमृता फडणवीसांना पेडणेकरांचे जशास तसे उत्तर

दत्ता लवांडे

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना, 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरेंची आठवण येते असं म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात त्यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे.

(Kishori Pednekar On Amruta Fadnavis)

उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान आहे पण त्यांची नशिबानेच थट्टा माडली असं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलं होतं. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर एक कविता रचत टीका केली आहे. सर्व नेत्यांचा अपमान करण्याचं कंत्राट अमृता फडणवीसांना दिलं असल्याची टीका पेडणेकरांनी केली.

किशोरी पेडणेकरांनी केलेली कविता -

एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव

मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केली

त्याला एका 'अमृता'ची दृष्ट लागली हो..

त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले...

अशी कशी नशिबाने थट्टा आज मांडली...

अशा शब्दांत अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, एका खाजगी टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात अमृता फडणवीसांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना पिंजरा या मराठी चित्रपटातील 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकवण्यात आलं होतं आणि हे गाणं ऐकून कुणाची आठवण येते हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "माननीय उद्धव ठाकरे, त्यांचा खूप मान सन्मान आहे पण त्यांच्या आयुष्याची खरंच नशिबाने थट्टा मांडली आहे." त्यानंतर त्यांच्या वर अनेक नेत्यांनी टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT