court-hammer court-hammer
महाराष्ट्र बातम्या

मिलिंदचा भाऊ आनंद तेलतुंबडेची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली

१५ दिवसांच्या अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली जिह्यात शनिवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा मोठा कॅडर मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) हा ठार झाला. त्यामुळे त्याची ९० वर्षीय आई एकटी पडली आहे. तिला भेटण्यासाठी भाऊ आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) याने १५ दिवसांच्या अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिता विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने फेटाळली (special court dismissed the petition) आहे. आनंद तेलतुंबडे याला २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

१३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात नक्षलवादी (Naxalites) आणि पोलिसांचे सी-६० दलामध्ये मोठी चकमक झाली होती. सकाळी ५.३० वाजताच्या सुरू झालेली चकमक रात्रीपर्यंत सुरू होती. या चकमकीत तब्बल २९ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. यात नक्षलवाद्यांचा कॅडर मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश होता. ही कारवाईने नक्षलवाद्यांची कंबरच तुटली होती. या चकमकीत चार पोलिस जवान जखमी झाले होते.

उच्च शिक्षित असलेला मिलिंद तेलतुंबडे हा जंगलात दीपक, बाबूराव तोफा आणि सह्याद्री या नावांनी वावरायचा. तसेच सह्याद्री या नावाने त्याने अनेकदा प्रसिद्धी माध्यमांना पत्रे पाठवली आहेत. त्याच्या मृत्यूनंतर भाऊ आनंद तेलतुंबडे याने १५ दिवसांच्या अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिता विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने फेटाळली आहे. त्याने याचिकेत आईला भेटू देण्याची विनंती केली आहे.

२०१८ मध्ये झालेल्या कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी आनंद तेलतुंबडेला अटक करण्यात आली आहे. आनंद तेलतुंबडे हा प्रतिबंधित संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारासाठी भाकपा (माओवादी) आणि तेलतुंबडे जबाबदार आहे, असा आरोप त्याच्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT