Vjay Wadettiwar sakal
महाराष्ट्र बातम्या

Vjay Wadettiwar : "आनंदाचा शिधा भेसळयुक्त, वजनही कमी! सरकार खातंय गरिबांच्या हक्काचा शिधा"

विजय वडेट्टीवार यांनी या शिधावापट केंद्रावर जाऊन पोलखोल केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : सरकारकडून गरिबांना दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिधावाटप केंद्रावर जाऊन या प्रकरणाची पोलखोल केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

आनंदाचा शिधा या योजनेमार्फत सरकारकडून कमी वजनाचे धान्य आणि भेसळयुक्त धान्य वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. ज्या कंत्राटदारांकडून या मालाचे वाटप केले जात आहे त्यावर कारवाई करण्याची मागणी करत सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

"सरकार खात आहे गरिबांच्या हक्काचा आनंदाचा शिधा. गोरगरिबांना वाटले जात आहे निकृष्ट दर्जाचा किराणा, आणि वजन ही कमी... काल माझ्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शिधा वाटप केंद्राला भेट देऊन वाटप करण्यात येत असलेल्या मालाची तपासणी केली. यामधील अनेक वस्तूंचा माल हा भेसळयुक्त असून मालाचे वजन ही कमी आहे."

"एक किलो तेलाच्या पाकिटात फक्त ९०० ग्राम तेल, डाळीच्या पाकिटात १ किलो पेक्षा कमी डाळ आढळून आली. याबत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु ज्या योजनेत पूर्ण भ्रष्टाचार हा सरकाच्या आशीर्वादाने होत असेल तिथे अधिकारी किती कारवाई करतील ही शंका आहे." असं म्हणत वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT