Uddhav Thackeray Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Andheri By-Election: शिंदे गटाचा डाव? ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंची उमेदवारी अडचणीत

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेवनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यावर दोघांकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. दोन्ही गटाचे नवे चिन्ह आणि नाव मतदारांपर्यंत किती जोमाने पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर शिंदे गटाकडून आता नवी खेळी खेळली जात असून ठाकरे गटाचा उमेदवार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

(Andheri By-Election Latest Updates)

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी ठाकरे गटाने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. पण आता त्यांच्यासमोर नवी अडचण निर्माण झाली असून महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मंजूर न झाल्याने त्यांच्या उमेदवारीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत.

त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांना आपल्या गटात खेचण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. तर निवडणूक अर्ज करण्यासाठी दोन दिवस राहिले असताना जर त्यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा मंजूर नाही झाला तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

दरम्यान, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. तर महानगरपालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्याचे काम नेत्यांकडून चालू आहे. पण ऐन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचा राजीनामा मंजूर केला जाईल का हे पाहणे महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT