pankaja-mundhe
pankaja-mundhe 
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांचे मानधन ऑनलाइन 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचे मानधन देण्यास विलंब होऊ नये, यासाठी त्यांचे आधारकार्ड जोडून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. मूर्तिजापूर (जि. अकोला) येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन देण्यास विलंब करणाऱ्या लिपिकास निलंबित करण्यात आले असून, अधिक चौकशीत तो दोषी आढळल्यास त्यास बडतर्फ करू, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिले. 

याबाबतचा प्रश्न सदस्य गोवर्धन शर्मा यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. मुंडे म्हणाले, की एकात्मिक बाल विकास योजना मूर्तिजापूर कार्यालयातील देयके तयार करणारे कनिष्ठ सहाय्यक अनधिकृतपणे गैरहजर असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन देण्यास विलंब झाला होता. आता सर्वांचे मानधन देण्यात आले असून, यापुढे विलंब होऊ नये यासाठी ऑनलाइन वेतन करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांस निलंबित करण्यात आले असून, त्याचे यापूर्वीचे रेकॉर्ड व वर्तणूक तपासून त्यास आवश्‍यकता भासल्यास त्यास सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT