anil parab sakal media
महाराष्ट्र बातम्या

250 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची लोकायुक्तांकडे सुनावणी

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आमदार कोटेचा यांनी केला होता आरोप

प्रशांत कांबळे

मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील (Maharashtra transport corporation) इटीआयएम मशिनच्या (ETIM machine) कंत्राटात परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) आणि एसटी महामंडळाच्या (st corporation) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून 250 कोटींचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा (250 crore scam) आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा (mihir kotecha) यांनी राज्यपालांकडे (governor) केली होती. त्यानंतर आता राज्यपाल यांचे आदेशानुसार प्रभारी लोक आयुक्त यांनी चौकशी (lokayukta investigation) सुरू केली असून, 2 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी ठेवण्यात आली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नुकतेच परिवहन विभागातील बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांशी संगनमत ठेऊन कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खुद्द परिवहन विभागातच एका निलंबित अधिकाऱ्याने केला होता. त्यांनतर आता एसटी महामंडळातील इटीआयएम मशीनच्या कंत्राट प्रकरणात भाजपा आमदाराने 250 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला असून, राज्यपालांनी यासबंधीत चौकशीचे आदेश लोकायुक्तांना दिले आहे.

त्यानुसार आता लोकायुक्तांनी आमदार मिहीर कोटेचा यांना सूनावणीची नोटीस पाठवली असून 2 सप्टेंबर रोजी गुगल मिट पद्धतीने ही सुनावणी पार पडणार असल्याचे कळविण्यात आले आहे. राज्यपालांनाकडे तक्रार केल्यानंतर आता लोकयुक्तांच्या चौकशीमध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT