Inspirational journey of Annabhau Sathe esakal
महाराष्ट्र बातम्या

Annabhau Sathe Jayanti : दीड दिवस शाळा, पण आयुष्यभर समाजाला शिकवण देणारा माणूस; अण्णा भाऊ साठेंची प्रेरणादायी क्रांतीगाथा

Literary Contribution of Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. ज्ञानाचे धनी असलेले साठे हे शाळेत शिकले नाहीत. ते फक्त दीड दिवस शाळेत गेले. तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला. अण्णा भाऊ साठे यांनी दोन लग्न केली.

साठे एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. दलितांमधील खदखद त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला साठे यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता, पण नंतर ते मार्क्सवादी-आंबेडकरवादाकडे वळले. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण तरीही उच्चवर्णीयांचे राहिलेले वर्चस्व त्यांना मान्य नव्हते. त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" अशी मोर्च्यातील घोषणा होती.

दलित आणि कामगारांच्या जीवनातील सत्य परिस्थिती व्यक्त करण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी कथांचा वापर केला. "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" असं ते १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात उद्घाटन भाषणात म्हणाले होते. साठे यांनी विपूल लेखन केले. त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे. फकिराला १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. त्यांचे १५ लघु कथा संग्रह आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली. विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.

साठेंनी लिहिलेली पुस्तके

  • अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)

  • अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)

  • अमृत

  • आघात

  • आबी (कथासंग्रह)

  • आवडी (कादंबरी)

  • इनामदार (नाटक, १९५८)

  • कापऱ्या चोर (लोकनाट्य)

  • कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)

  • खुळंवाडा (कथासंग्रह)

  • गजाआड (कथासंग्रह)

  • गुऱ्हाळ

  • गुलाम (कादंबरी)

  • चंदन (कादंबरी)

  • चिखलातील कमळ (कादंबरी)

  • चित्रा (कादंबरी, १९४५)

  • चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)

  • नवती (कथासंग्रह)

  • निखारा (कथासंग्रह)

  • जिवंत काडतूस (कथासंग्रह)

  • तारा

  • देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)

  • पाझर (कादंबरी)

  • पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)

  • पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)

  • पेंग्याचं लगीन (नाटक)

  • फकिरा (कादंबरी, १९५९)

  • फरारी (कथासंग्रह)

  • मथुरा (कादंबरी)

  • माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)

  • रत्ना (कादंबरी)

  • रानगंगा (कादंबरी)

  • रूपा (कादंबरी)

  • बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)

  • बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)

  • माझी मुंबई (लोकनाट्य)

  • मूक मिरवणूक(लोकनाट्य)

  • रानबोका

  • लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)

  • वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)

  • वैजयंता (कादंबरी)

  • वैर (कादंबरी)

  • शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)

  • प्रवासवर्णन

  • कविता आणि माझा रशियाचा प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 5th Test: भांडणं झाली पण तरी जो रुट - करुण नायरच्या त्या कृतींनी जिंकली लाखो चाहत्यांची मनं; पाहा नेमकं काय झालं

Neck Lump Causes: सतत मानेच्या खाली गोळा जाणवतोय? मग हे कारण आणि उपाय जाणून घ्या

Megaflash Lightning : अमेरिकेत ८२९ किमीपर्यंत विजेचा लखलखाट, सर्वांत लांब अंतरापर्यंत चमकल्याचा नवा विक्रम; २०१७ मधील वादळात नोंद

Raj Thackeray: एकदा अटक करून दाखवा, राज ठाकरेंचे सरकारला खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

Nandurbar News : एका चिमुकल्याची संघर्षगाथा! चांदसैली घाटातील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी सातवीतला विद्यार्थी भीक मागतोय

SCROLL FOR NEXT