महाराष्ट्र

केबलसाठी आता १३० रुपयांचे दुसरे पॅक?

सकाळवृत्तसेवा

मुंबई -  नव्या दरप्रणालीसंदर्भात एमएसओने करार न केल्यामुळे नाराज केबल ऑपरेटर ग्राहकांकडून नवे फॉर्म स्वीकारण्याची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. अशा स्थितीत काही एमएसओंनी १५० रुपयांच्या फ्री टू एअर पॅकसोबत १३० रुपयांचे दुसरे सर्वसमावेशक पॅक तयार करण्याची धडपड चालवली आहे. 

केबलच्या नव्या दरप्रणालीचा स्वीकार करण्यासाठी गुरुवारी अखेरचा दिवस होता. मात्र, निम्म्याहून जास्त केबल ग्राहकांनी त्यासाठीचे अर्ज भरलेले नाहीत. दुसरीकडे, काही एमएसओ व ब्रॉडकास्टर अद्यापही बुके देत असल्याने काही केबल ऑपरेटर संघटनांची त्यांच्याशी वादावादी सुरू आहे. काही कंपन्या मोठे बुकेच विकत असल्याने नेमके काय निवडायचे, याबाबत ग्राहक संभ्रमात आहेत; तर या गोंधळात काही एमएसओंनी १३० रुपयांचे नवे पॅकेज आणण्याची तयारी केली आहे. ग्राहकांना १५४ रुपयांत १०० फ्री टू एअर चॅनेलचे एक पॅकेज घ्यावे लागेल. त्याखेरीज मुंबईतील भाषिक पट्ट्यांनुसार त्या-त्या चॅनेलचा समावेश करून १३० रुपयांपर्यंतचे दुसरे पॅकेज एमएसओ तयार करीत आहेत , असे मनसेच्या केबल सेनेने आपल्या केबल ऑपरेटरना सांगितले आहे.  

ग्राहकांकडून भरून घ्यायचे अर्ज कंपन्यांनी आम्हाला दिलेलेच नाहीत. त्यांना आपले मोठमोठे बुके विकायचे आहेत, पण दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केबल ऑपरेटरना बुके विकायला बंदी घातली आहे, हा अन्याय आहे.
- अनिल परब, अध्यक्ष, केबल ऑपरेटर डिस्ट्रिब्यूटर असोसिएशन

पूर्वीचे पॅकेज ‘टाटा स्काय’साठीच 
ग्राहकांना यापूर्वी जास्त मुदतीची पॅकेज दिली असतील, तर ती मुदत संपेपर्यंत सुरू ठेवण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने ‘टाटा स्काय’ला संमती दिली आहे. मात्र, ही परवानगी इतरांना मिळालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT