api malole sakal
महाराष्ट्र बातम्या

आत्महत्येपूर्वी ‘API’ माळाळे यांची मुलाला भावनिक चिठ्ठी; खूप खूप प्रगती कर, माझं नाव रोशन कर! आईचा टाहो, माझा ढाण्‍या वाघ गेला, बाळा तुला कुठे शोधू?

असित, खूप खूप प्रगती कर. माझं नाव रोशन कर, अशी अपेक्षायुक्‍त भावनिक साद सहायक पोलिस निरीक्षक आनंद माळाळे यांनी आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीतून मुलाला घातली आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : असित, खूप खूप प्रगती कर. माझं नाव रोशन कर, अशी अपेक्षायुक्‍त भावनिक साद सहायक पोलिस निरीक्षक आनंद माळाळे यांनी आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीतून मुलाला घातली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक माळाळे यांना असित नावाचा एक मुलगा आहे. तो सध्‍या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीत माळाळे यांनी मुलगा असितविषयी प्रेमपूर्ण निवेदन करतानाच, त्‍याच्‍याकडून अपेक्षा व्‍यक्‍त केल्‍या आहेत. त्‍यांनी त्‍यात म्‍हटले आहे, माझा विवाह वंदनासोबत झाला. छोटे-मोठे कौटुंबिक कलह सोडले तर आमच्‍यात कधीही कोणत्‍याही विषयावर मतभेद झाले नाहीत.

आमचा एक सुविद्य, सुंदर गोंडस असा एक मुलगा आहे असित…! त्‍याला माझ्‍या खूप खूप शुभेच्‍छा ! त्‍याने खूप खूप प्रगती करावी. माझे नाव त्‍याने रोशन करावे, अशी माझी इच्‍छा आहे. चिमू आणि पिल्‍लू मला माफ करा. मी तुमच्‍यासाठी काही भरीव योगदान देऊ शकलो नाही. माझ्‍या पश्‍‍चात तुम्‍ही दोघेही जीवाचे रान करुन चांगल्‍या भवितव्‍यासाठी अटोकाट प्रयत्‍न कराल. पिल्‍लूला माझे शुभाशीर्वाद. त्‍याच्‍या उज्‍वल भविष्‍यासाठी लाख लाख शुभेच्‍छा ! चिमू मला मला माफ कर, असेही मुलगा व पत्‍नीला आवाहन केले आहे. तर माझ्‍या कुटुंबाला कोणतीही प्रशासकीय अडचण येणार नाही, यासाठी माझ्‍या कुटुंबियांना मदत करावी, असे आवाहन त्‍यांनी त्‍यांच्‍या सर्व बॅचमेट्‍सना केली आहे.

मायबाप सरकारला विनंती

मी आतापर्यंत २५ वर्षे सरकारची इमानेइतबारे सेवा केली आहे. बिलोली पोलिस ठाण्‍यात हजर झाल्‍यापासून माझ्‍याबाबतीत अनेक उलटसुलट गोष्‍टी घडत आहेत. माझ्‍या पश्‍‍चात माझी पत्‍नी व मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्‍यास कोणतीही अडचण येऊ नये, ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे.

  • माझा ढाण्‍या वाघ गेला, बाळा तुला कुठे शोधू?

  • सावत्र आईचा टाहो; पत्‍नी, मुलाच्‍या हंबरड्याने उपस्‍थितांचे डोळे पाणावले

सोलापूर : माझा ढाण्‍या वाघ गेला, बाळा तुला कुठे शोधू, असा आर्त टाहो साहाय्‍यक पोलिस निरीक्षक आनंद माळाळे यांच्‍या आई रंजना यांनी फोडला. त्‍यांच्‍यासह पत्‍नी वंदना, मुलगा असित यांच्‍या हंबरड्याने शासकीय रुग्‍णालयात जमलेल्‍या लोकांचे डोळे पाणावले. माय मरो, मावशी जगो, असे म्‍हटले जाते. लहानपणीच आनंद यांच्‍या आईचे निधन झाले. त्‍यानंतर त्‍यांच्‍या सावत्र आईने म्‍हणजेच मावशीने त्‍यांना आईचे प्रेम दिले. त्‍याचा प्रत्‍यय त्‍यांनी आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीतून आणि मुलगा सोडून गेल्‍यानंतर त्‍यांच्‍या आईने शोकातून आला. कारण त्‍या रडून रडून बेशुद्ध पडल्‍या होत्‍या. रिव्‍हॉल्‍व्‍हरने गोळी झाडून आत्‍महत्‍या केल्‍यानंतर सहाय्‍यक पोलिस निरीक्षक माळाळे यांचा मृतदेह शवविच्‍छेदनासाठी शासकीय रुग्‍णालयात आणण्‍यात आला. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबियांसह नातेवाईक व लोक तेथे जमले होते. माळाळे कुटुंबीय शोगमग्‍न होते. डोळ्यांतून वाहत्‍या अश्रूधारांसह त्‍यांचा आकांत सुरू होता. आई रंजना या माझा ढाण्‍या वाघ गेला, बाळा तुला कुठे शोधू ? जिवाचे रान करुन पोराला मोठं केलं. खूप हुशार मुलगा होता, असा कसा सोडून गेला, तुला टेन्‍शन होतं तर मला सांगायचं होतं, अशा शब्‍दांत आक्रोश करत होत्‍या. त्‍या सावत्र आई असल्‍या तरी सख्‍या आईप्रमाणे त्‍यांनी आनंद यांचे संगोपन केले होते. त्‍यामुळे त्‍यांचे हे रडणे पाहून शासकीय रुग्‍णालयात दु:खाचे सावट पसरले होते.

बालपणी आई वारली, पण...

१ जानेवारी १९७६ रोजी जन्‍मलेल्‍या आनंद यांची आई ते एक वर्षाचे असताना वारल्‍या. ते त्‍यांना आठवतही नव्‍हते. त्‍यानंतर त्‍यांची सख्‍खी मावशी रंजना या सावत्र आई म्‍हणून लाभल्‍या. त्‍यांनी सख्‍ख्‍या आईपेक्षाही जास्‍त प्रेमाने त्‍यांचा सांभाळ केला, असे सहाय्‍यक पोलिस निरीक्षक माळाळे यांनी आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीत आईविषयी म्‍हटले आहे. त्‍यावरुन सावत्र आईने त्‍यांना कधीही आईची उणीव भासू दिली नसल्‍याचेच दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT