rajesh tope rajesh tope
महाराष्ट्र बातम्या

'आरोग्य विभागातील पदांसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया'

या पदांसाठीची प्रक्रिया दुसऱ्या एका एजन्सीमार्फत राबविली जाणार आहे. गट ‘अ’ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी समुपदेशन पद्धतीने परीक्षा न घेता गुणांवरच नेमणुका केल्या जातील

मनोज साखरे

औरंगाबाद: आरोग्य विभागातील पदभरती प्रक्रिया जोरात सुरू आहे. ‘क’ व ‘ड’ संवर्गातील बारा हजार पदे भरतीसाठी खासगी एजन्सी निश्‍चित झाली आहे. नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणार आहे. येत्या चार दिवसांत आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी रविवारी (ता. एक) येथे दिली.

टोपे म्हणाले, ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदे भरतीसाठी निश्चित केलेल्या खासगी एजन्सीसोबत करार करून बारा हजार पदांसाठी अर्ज मागविले जातील. यासंदर्भात काढल्या जाणाऱ्या जाहिरातीत भरती प्रक्रियेचे सर्व नियम, निकष असतील. गट ‘अ’चे एक हजार डॉक्टर, ‘स्पेशालिस्ट’ व ‘एमबीबीएस’ डॉक्टर्स भरले. त्याच पद्धतीने हीच आणखी एक हजार पदे येत्या चार दिवसांत भरणार आहोत.

या पदांसाठीची प्रक्रिया दुसऱ्या एका एजन्सीमार्फत राबविली जाणार आहे. गट ‘अ’ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी समुपदेशन पद्धतीने परीक्षा न घेता गुणांवरच नेमणुका केल्या जातील. अडचणी न आल्यास आरोग्य विभागातील सर्व जागा दोन महिन्यांत भरल्या जातील, अशी माहितीही आरोग्यमंत्री टोपेंनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT