Chhagan-Bhujbal
Chhagan-Bhujbal 
महाराष्ट्र

मागासवर्गीयांची नियुक्ती खुल्या जागांवर करा - भुजबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक - सामाजिक आरक्षणासाठी 2014 पूर्वी लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू करावे. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिकांची नियुक्ती करावी. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली. त्यासंबंधाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.

भुजबळ म्हणाले, की सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात. मात्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू होत नाही. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत आहे. म्हणून मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या भरतीपासून रोखणारे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी 27 ऑगस्ट 2018 च्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले आहे. हे अपील मागे घेण्याचे निर्देश व्हावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT