high court sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरचे नितीन जामदार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती! महापालिकेचे वकिल ते मुख्य न्यायमूर्ती प्रवास...

राज्याच्या उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून मूळचे सोलापूरचे असलेले नितीन मधुकर जामदार यांची नेमणूक झाली आहे. राष्ट्रपतींकडून त्यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले असून उद्या (बुधवारी) ते पदभार स्वीकारतील.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून मूळचे सोलापूरचे असलेले नितीन मधुकर जामदार यांची नेमणूक झाली आहे. राष्ट्रपतींकडून त्यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले असून उद्या (बुधवारी) ते पदभार स्वीकारतील.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे मंगळवारी (ता. ३०) सेवानिवृत्त झाले. त्यांना अवघे तीनच दिवस त्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. आता मुख्य न्यायमूर्ती म्हणून नितीन जामदार हे काम पाहणार आहेत. सोलापुरातील किल्ला बागेसमोरील जामदार टॉवर येथे त्यांचे वडिल, आजोबा वास्तव्यास होते. त्यांचे वडील मधुकर जामदार हे लॉ कॉलेजचे प्राचार्य होते. त्यानंतर त्यांची सांगली येथे सहायक सत्र न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. तेथील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. शेवटी ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील झाले. नितीन जामदार यांचे आजोबा शंकरराव जामदार यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग राहिला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष देखील होते. दरम्यान, नितीन जामदार यांचे बालपण सोलापुरातच गेले.

प्राथमिक शिक्षण सोलापुरातच

प्राथमिक शिक्षणानंतर ते शालेय शिक्षणासाठी हरिभाई देवकरण प्रशालेत काही काळ शिकले. पण, वडिल मधुकर जामदार यांच्या बदलीनंतर तेही सांगलीला गेले. नितीन जामदार यांनी काही काळ सोलापूर महापालिकेचे वकिल म्हणूनही काम पाहिले आहे. ॲड. भीमराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिलीचे धडे घेतले होते. नितीन यांच्या रुपाने जामदार कुटुंबियांची तिसरी पिढी वकिली व्यवसायात आली. ते सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहत होते. आता त्यांची नेमणूक मुख्य न्यायमूर्ती म्हणून झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT