Ashadhi Ekadashi Mahatva in Marathi esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढ महिन्यातल्या एकादशीलाच मोठी एकादशी का म्हणतात?

Ashadhi Ekadashi Mahatva in Marathi: हिंदू सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्व आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Why Ashadhi Ekadashi Called As Maha Ekadashi : दर महिन्यात दोन अशा प्रमाणे पंचांगानुसार वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नावं आहेत. वारकरी संप्रदाय आणि सर्व विष्णू भक्तांसाठी एकादशीचं व्रत हे विशेष असतं. शिवाय हिंदू सनातन धर्मातही या व्रताला विशेष महत्व देण्यात आले आहे.

पण या सर्व एकादशींमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना मोठी एकादशी म्हटलं जातं. त्या मागे कारणही तसंच विशेष आहे.

आषाढाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पंढरपूर इथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी यावेळी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमा होतीत. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदूमते.

भागवत धर्माविषयी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत महती पोहचवली. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात याविषयी विशेष आस्था आहे. वारकरी लोकांसाठी तर हा प्राणप्रिय भाग आहे.

एकादशी अन् दुप्पट खाशी

एकादशीचा उपवास जसा धार्मिक, अध्यात्मिक आस्थेचा विषय आहे तसा तो आरोग्यासाठीही फार उपयुक्त आहे असं शास्त्र सांगते. हा उपास काही न खाता पिता करणे अपेक्षित असते. पण लोक एकादशी अन् दुप्पट खाशी करतात, जे अयोग्य असल्याचं शास्त्र सांगते. हे व्रत म्हणजे तहानभूक हरपून जावी एवढे ईश्वर चिंतन करावे.

उप म्हणजे देव आणि वास म्हणजे राहणे. एकादशीचा उपवास म्हणजे तहानभूक विसरून केवळ देवाच्या नामस्मरणात त्यांच्या सहवासात राहणे असते असं शास्त्र सांगते.

मोठी एकादशी का म्हणतात?

आषाढी एकादशीला सृष्टीचे पालन कर्ता भगवान विष्णू झोपतात. त्यांच्या निद्रेचा कालावधी चार महिन्यांचा असतो. हा चातुर्मास या एकादशी पासून सुरू होतो. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.

आणि या आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा चातुर्मासाचा कालावधी अधिकाधिक व्रतवैकल्यांचा समजला जातो. त्यामुळे या दोन्ही एकादशींना इतर एकादशींच्या तुलनेत विशेष समजले जाते. म्हणून यांना मोठी किंवा महा एकादशीही म्हटलं जातं.

या चातुर्मासात विविध पूज, व्रत, सण, उत्सव केले जातात. याद्वारे आपल्या देवाला संतोषण्याचा प्रयत्न करतात.

चातुर्मास व्रत

आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्रीपुरुष अनेक नेम सुरू करतात. अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, अश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वर्ज्य करतात.

काही जण चार महिने एकभूक्त राहतात. तर काही जण सुखशय्या वर्ज्य करताता. काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात. नित्य देव दर्शन, कथा किर्तन, श्रवण, पूजा, अभिषेक, नदीस्नान असे अनेक नेमधर्म आचरण्याची परंपरा अनेक लोक आजही पाळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT