bjp Ashish Shelar critisize mva govt  
महाराष्ट्र बातम्या

पक्षाचे आदेश झुगारून मविआचे आमदार मुर्मू यांना मतदान करतील - शेलार

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही - आशिष शेलार

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही - आशिष शेलार

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. पक्षाचे आदेश झुगारून महाविकास आघाडीचे आमदार मुर्मू यांना मत देतील, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. आज ते मुंबईत बोलत होते. पक्षाच्या पलिकडे जाऊन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदारही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील असंही ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पुढे शेलार म्हणाले, काही नेत्यांना सकाळी बोलायचं एवढच काम उरलं आहे, असा टोमणाही त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. ते म्हणाले, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मतदान होईल. महाविकास आघाडीचं राज्यात अस्तित्व दिसत नाही, त्यांच्यात समन्वय नाही, असंही ते म्हणाले आहेत.

सर्वाच्च न्यायालयात शिंदे सरकारच्या बाजूने लागले. त्यामुळे आता शिवसेनेच्या काही नेत्यांना सकाळी माध्यमांसमोर बोलायचं आणि दुपारी न्यायालयात याचिका दाखल करायची इतकच काम राहिलं आहे, असा टोला त्यांनी सेनेला लगावला आहे. द्रौपदी मुर्मू यांना भरघोस मतदान होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT