Ashok Chavhan Daughter Shrijaya Chavhan Will Join Politics Bharat Jodo Yatra  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shrijaya Chavhan: लेकीच्या राजकीय एन्ट्रीनंतर अशोक चव्हाणांचे सूचक ट्विट; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली मात्र, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या लेकीची. चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण या राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. दरम्यान, आता चर्चा आहे ती अशोक चव्हाणांच्या सूचक ट्विटची. (Ashok Chavhan Daughter Shrijaya Chavhan Will Join Politics Bharat Jodo Yatra)

अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. यावेळी तिने पदयात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणाबाबत सूचक संकेत दिले आहेत.

''पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात,तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार.'' असं चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात उपस्थित होणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस कोण ? या प्रश्नाला पुर्णविराम मिळाला आहे. श्रीजया चव्हाण यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. अलिकडेच पोस्टरवरही त्यांचा फोटो दिसू लागलाय. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोकरावांच्या निवडणुकीत दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून लीलया सांभाळली. तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT