solapur zp ceo manisha awhale  sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाचवीतील अथर्वची कमाल, लिहिली गोष्टीची दोन पुस्तके! चिमुकल्याने लिहिले सीईओंना पत्र, सीईओ म्हणाल्या, शाळेला नक्की भेट देईन

नेवरे (ता. माळशिरस) येथील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व अमोल सोपनर या चिमुकल्याने चक्क गोष्टीची दोन पुस्तके लिहिली आहेत. अथर्वने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांना पत्र पाठवून पुस्तके व शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविता कशा वाटल्या, याचे उत्तर देण्याची विनंती केली.

तात्या लांडगे

सोलापूर : नेवरे (ता. माळशिरस) येथील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व अमोल सोपनर या चिमुकल्याने चक्क गोष्टीची दोन पुस्तके लिहिली आहेत. स्वत:च्या हस्ताक्षरात अथर्वने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांना पत्र पाठवून पुस्तके व शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविता कशा वाटल्या, याचे उत्तर देण्याची विनंती केली. सीईओंनी त्याचे विशेष कौतुक करीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता कमी होत असल्याने पटसंख्या कमी होत असल्याची स्थिती संबंध राज्यात आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील १० हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या १० ते २० पर्यंतच आहे. पण, सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये गुणवत्तेच्या बळावर प्रवेश क्षमतेपेक्षाही अधिक प्रवेश होतात ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, आता मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी गुणवत्तेवरच अधिक भर द्यायला सुरवात केली आहे. त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांनी शाळांना देखील अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम आखला आहे. अन्य अधिकारी कार्यालयात बसूनच कामकाज पाहत असले तरीदेखील सीईओ मात्र स्वत: गावोगावी भेटी देऊन महिला, विद्यार्थी अशा विविध घटकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. त्यातूनच नेवरे जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील अथर्वने सीईओंकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

सीईओंना लिहिलेले अथर्वचे पत्र...

आदरणीय सीईओ मॅडम, यांना माझा नमस्कार, माझे नाव अथर्व अमोल सोपनर असून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवरे, ता. माळशिरस येथे इयत्ता पाचवीत शिकत आहे. माझी शाळा सुंदर शाळा आहे. माझ्या शाळेतील सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी गोष्टीची दोन पुस्तके लिहिली आहेत. तसेच माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. माझ्या गोष्टी आणि कविता आमच्या पुण्यातील लाडक्या रेणुका ताईंनी प्रकाशित केल्या आहेत. ही पुस्तके आपणास भेट म्हणून पाठवत आहे. तरी माझ्या गोष्टी व आमच्या कविता कशा वाटल्या हे नक्कीच कळवा. मी आपल्या उत्तराची वाट पाहतो, तसेच आमच्या शाळेला नक्की भेट द्या, असे पत्र त्या पाचवीतील चिमुकल्याने सीईओंना पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी, सर्व ६ खासदार खूश : एकनाथ शिंदे

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT