

Common Lifestyle Habits May Be Reducing Men's Fertility | Male Infertility
sakal
Male Infertility on the Rise: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यावर होताना दिसत आहे. बदललेला आहार, वाढता ताण-तणाव, अपुरी झोप आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. यामध्ये वंध्यत्व (Infertility) ही एक गंभीर समस्या म्हणून समोर येत आहे.
अनेकदा वंध्यत्वाचा संबंध केवळ महिलांशी जोडला जातो, पण पुरुषांमध्येही ही समस्या वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः काही जीवनशैलीतले घटक पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतात.