महाराष्ट्र

पैसे न दिल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा

उरण : पनवेल तालुक्‍यातील न्हावा गावातील एका दुकानदारावर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस न्हावा-शेवा पोलिसांनी अटक केली आहे. नारायण काशिनाथ पाटील (५५) असे दुकानदाराचे नाव असून पोलिसांनी आरोपी सुशांत ठाकूर (३०) याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सुशांत ठाकूर याने फिर्यादी नारायण पाटील यांच्या न्हावा गावातील मालकीच्या साई बेकरीमध्ये शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास बेकरीच्या गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने मागितले, त्यावर पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी ठाकूरने त्यांच्यावर धारदार लोखंडी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी आरोपी सुशांत ठाकूर याच्याविरुद्ध भा.दं.वि. ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT