Bacchu Kadu News Updates google
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना, मनसेनंतर आता बच्चू कडूही करणार अयोध्या वारी

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

अयोध्या दौऱ्यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या अयोध्या वारीच्या घोषणेनंतर अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषणसिंह यांनी त्यांना विरोध दर्शवला. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि अयोध्येत पाऊल ठेवावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आता मंत्री बच्चू कडूनींही अयोध्या वारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. (Bacchu Kadu Ayodhya Tour)

राज्यातील मनसे, शिवसेना आणि कॉंग्रेसने अयोध्यावारी जाहीर केल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही अयोध्याला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अमरावती बडनेरा येथे बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. हिंदु मुस्लीम ऐक्यासाठी आम्ही भारताचा तिरंगा घेऊन अयोध्याला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक राजकर्त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. आम्हीही अशाच प्रकारचा अयोध्या दौरा करणार असून त्यासाठी तिरंगा यात्रेचे अयोजन करत आहोत. तिरंगा हे हिंदुस्थानच्या एकतेचे प्रतिक आहे. त्यामुळे देशातील हिंदु-मुस्लिम ऐक्य एकजुटीने रहावे यासाठी अयोध्याला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा वाद उफाळून आला आहे. यानंतर राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अमरावतीतील बडनेरा येथे अयोध्या दौरा करणार असल्याचे वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही भारताचा तिरंगा घेऊन आयोध्या जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT