Bal Thackeray Agreed to Give More Building Rights to Mosques to Stop Namaz on Roads
Bal Thackeray Agreed to Give More Building Rights to Mosques to Stop Namaz on Roads esakal
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम: किस्सा नमाजका...

हलिमाबी कुरेशी, Bhushan Tare भूषण टारे

राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यपातळीवर सध्याचं राजकारण हिंदुत्वाच्या भोवतीने फिरत आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेली मनसे सुद्धा आता मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा हातात घेऊन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला खिंडीत रोखण्याच्या प्रयत्नात आहे.
शिवसेनेसाठी हिंदुत्व तर गेली अनेक वर्षे प्रमुख राजकीय मुद्दा राहिला आहे. पण तरीही आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेने मुस्लिमांसंदर्भातील प्रश्न नेहमी चर्चेने सोडवल्याचं म्हंटलंय. यासंदर्भात त्यांनी हिंदुहृदय सम्राट अशी ओळख असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली.

नव्वदच्या दशकातला काळ. तेव्हा रस्त्यावरील नमाज ही मुंबईतील वाहतुकीसाठी मोठी समस्या बनली होती, मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मंबईतील मौलवींशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढला होता, तसंच युतीची सत्ता आल्यानंतर रस्त्यावर नमाज पढण्याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर चर्चा केली होती, जागा कमी असल्यामुळे रस्त्यावर नमाज पठण केलं जातं असल्याचं कळल्यावर एफएसआय वाढवुन दिल्याची आठवण संजय राऊत यांनी सांगितली.

याच नमाजपठणाशी जोडला गेलेला बाळासाहेब ठाकरेंचा आणखी एक आठवण ठाकरे या संजय राऊत यांचं कथानक असलेल्या सिनेमात सांगितली आहे. एकदा महेमूद शेख नावाची व्यक्ती दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपली अडचण सांगण्यासाठी व शस्त्रक्रियेसाठी मदत मागण्यासाठी मातोश्रीवर आले होते.

बाळासाहेबांशी बोलताना अचानक त्यांना आठवलं कि नमाज पठणाची वेळ झाली आहे. महेमूद शेख यांची अस्वस्थता ओळखून बाळासाहेबांनी त्यांना मातोश्री बंगल्यातल्याच एका खोलीत पाठवलं. तिथेचं महेमूद शेख यांनी नमाजपठण केलं होतं. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेले आणि देशाशी बांधिल असलेल्या मुसलमानांचा आपण द्वेष करत नाही, पण पाकिस्तान धार्जिण्या मुसलमानांना धडा शिकवणार असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते..माझा साबिर मंत्री होता, असं बाळासाहेब अतिशय आत्मीयतेने महेमूद शेख यांच्याशी बोलले होते. हा किस्सा अनेकदा ज्येष्ठ मंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलायं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT