महाराष्ट्र

भाजप सरकारला पाकचा कांदा कसा चालतो? : थोरात 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील "मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन'ने (एमएमटीसी) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे, असा प्रश्‍न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. 

ते म्हणाले, "एमएमटीसीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तानमधून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढली आहे. इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा, हा भाजपचा दुतोंडीपणा आहे. कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील; परंतु भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त आहे. 

दिवाळीनंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येणार असताना पाकिस्तानातून आयात करण्याची गरजच काय, पाकिस्तानबद्दल कोणीही काही बोलले की लगेच त्याला पाकिस्तानसमर्थक ठरवून अगदी देशद्रोह्याचा शिक्का मारण्याचा एककलमी कार्यक्रम भाजप व त्यांच्या समर्थकांनी चालवला आहे. नेहमी पाकिस्तानच्या नावाने ओरडणाऱ्या भाजपला पाकिस्तानचा कांदा कसा काय चालतो.'' 

कांद्याचे भाव पाडण्यासाठी सरकारने पाकिस्तानातून जाणीपूर्वक आयातीचा निर्णय घेतल्याचे ट्‌विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT