Bandatatya Karadkar Controversial Statement against mahatma gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

बंडातात्यांची जीभ पुन्हा घसरली, महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Bandatatya Karadkar Controversial Statement Mahatma Gandhi : पुणे : बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. यापूर्वी त्यांनी राजकारणातील महिलांविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता महात्मा गांधींबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. महात्मा गाधींचा उल्लेख म्हातारा करत ते म्हणाले, ''भगतसिंगांच्या मनावर इतका परिणाम झाला होता, की आता या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचं काहीही कारण नाही.''

क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते. ''भगतसिंगांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की, या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचं काही कारण नाही, असा विचार त्यांनी केला. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. या म्हाताऱ्याच्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्ष लागतील'', असं लोकमान्य टिळकांचं वक्तव्य असल्याचा दावा देखील बंडातात्या कराडकरांनी केला. ''शेवटी आपल्याला माहिती आहेच की, १९४७ साली आपल्याला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालं नाही. १९४२ साली सुरू झालेल्या क्रांतिकारक चळवळीमुळे इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला'', असं बंडातात्या म्हणाले. याबाबत 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

''साबरमती के संत तुने कर दिया कमाल, दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल असं म्हणणं म्हणजे साडेतीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही'', असं बंडातात्या म्हणाले.

बंडातात्यांनी यापूर्वी देखील राज्याच्या राजकारणातील महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात, असं ते म्हणाले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे बंडातात्यांनी माफी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT