solapur

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

बंजारा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चात महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह महिलांचा मोठा सहभाग होता. मोर्चाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंजारा समाजबांधव बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होते. एकच मिशन एसटी आरक्षण, आरक्षण मिळेपर्यंत बंजारा समाज थांबणार नाही, न्याय हवा, हक्क हवा, बंजाराला एसटी आरक्षण हवा आदी मागण्यांचे घोषणा समाजबांधवांनी दिल्या.

तात्या लांडगे

सोलापूर : बंजारा समाजाला अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) चे आरक्षण असताना महाराष्ट्रात केवळ विमुक्त जाती (व्हीजे) म्हणून आरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीत महाराष्ट्रातील बंजारा समाज मागे पडला आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा, लंबाडा व सुगळी समाज हा भटकंती करणारा व आदिवासी जीवनशैली जपणारा समाज असल्याची नोंद असल्याने, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्य बंजारा (एसटी) आरक्षण कृती समितीच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात १० ते १५ हजार समाजबांधव व बंजारा भगिनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चात राज्याचे वरिष्ठ नेते आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार देवानंद चव्हाण, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना अध्यक्ष देविदास राठोड, राष्ट्रीय गोर सिकवाडीचे अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोर्चा सकाळी ११ वाजता नेहरूनगर येथील संत सेवालाल चौकातून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात मोतीराम चव्हाण, प्रा.भोजराज पवार, सुभाष चव्हाण, अलका राठोड, युवराज राठोड, युवराज चव्हाण, नाम पवार, संदीप राठोड, सचिन चव्हाण, विजय राठोड, सुरेश पवार, लाला राठोड, मोतीराम राठोड, प्रकाश राठोड, बंटी राठोड, शैलजा राठोड, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बैलगाड्या ठरल्या लक्षवेधी...

बंजारा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चात महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह महिलांचा मोठा सहभाग होता. मोर्चाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंजारा समाजबांधव बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होते. एकच मिशन एसटी आरक्षण, आरक्षण मिळेपर्यंत बंजारा समाज थांबणार नाही, न्याय हवा, हक्क हवा, बंजाराला एसटी आरक्षण हवा आदी मागण्यांचे घोषणा समाजबांधवांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT