Baramati Lok Sabha 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Baramati Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. यानंतर आता सर्वांच्या नजरा या लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाकडे लागल्या आहेत.

रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. यानंतर आता सर्वांच्या नजरा या लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाकडे लागल्या आहेत. यादरम्यान आज वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

TV9 पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास, या अंदाजानुसार महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपला १८, शिवसेनेला ४ म्हणजे महायुतीला एकूण २२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला २५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या अंदाजात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एकही जागा दाखवण्यात आलेली नाहीये. याचाच अर्थ बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार असून येथे पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेच खासदार होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सध्या देशाचे लक्ष लागले असून याचे कारण म्हणजे येथे होत असलेली हाय व्होल्टेज लढत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामती येथे अजित पवार आणि शरद पवार एकमेकासमोर आल्याचे पाहायला मिळले. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हे पवार कुटुंबातील दोन उमेदवार परस्परविरोधात उभे ठाकले. त्यामुळे मतदार कोणाला कौल दोणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल मतदारांच्या मनात असलेली सहानुभूती, तसेच सुप्रिया सुळे यांचे संसदेतील काम. तर दुसरीकडे अजित पवार यांनी बारामतीत केलेला विकास तसेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे हे मुद्दे बारामती लोकसभा मतदारसंघात महत्वाचे ठरल्याचे पाहायला मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT