Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला पडणार मोठं खिंडार; 4 आमदारांसह 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात?

शिवसेना फुटल्यामुळं आमदारांची गळती लागली असून शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना फुटल्यामुळं आमदारांची गळती लागली असून शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे.

बुलडाणा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र, हे सर्व एवढ्यावरच थांबलं नाही, तर शिवसेनेला (Shiv Sena) अजूनही एकावर एक झटके बसताना दिसत आहेत. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.

अशातच आता शिवसेनेतील आणखी आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलाय. शिवसेना फुटल्यामुळं आमदारांची गळती लागली असून शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी 4 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून 3 खासदार देखील लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यात एक मुंबईचे खासदार असतील, असा दावा जाधव यांनी केला आहे.

तसंच, मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील शिंदे गटात येणार असल्याचं बोललं जात असताना त्याला खासदार जाधव यांनी दुजोरा दिला आहे. नार्वेकरच नव्हे, तर 3 खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचं जाधव म्हणाले आहेत. जाधव यांचा हा दावा खरा झाल्यास शिवसेनेला दसरा मेळाव्याआधी मोठं खिंडार पडणार आहे.

आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT