Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'पक्षाने पोरकेपणात सावली दिली नाही', राष्ट्रवादी सोडण्याआधी नेत्याने व्यक्त केली खंत

राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालकेंचा उद्या ‘बीआरएस’मध्ये प्रवेश

अंकिता खाणे (Ankita Khane)

स्व. भारतनानांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचे व मतदारसंघाचे छत्र हरपले होते. अशा परिस्थितीत राजकीय पोरकेपणा दूर करण्यासाठी राजकीय सावली द्यायची सोडून पक्षाने वेगळी दिशा दाखवण्याचे काम केल्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पक्ष बदलाचा निर्णय तुमच्या बरोबरीने घेत आहे, असं वक्तव्य भगीरथ भालके यांनी केले.(Latest Marathi News)

भविष्यातील राजकीय वाटचाली संदर्भात येथील विचारविनिमय बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘दामाजी’चे उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, दयानंद सोनगे, बसवराज पाटील, भारत बेदरे, रामभाऊ वाकडे, ज्ञानेश्वर भगरे, भारत नागणे, सुनील डोके, दादा पवार, नितीन पाटील, महादेव फराटे, दत्तात्रय कांबळे, गुलाब थोरबोले, काका डोंगरे, संदीप फडतरे आदींसह भालके समर्थक उपस्थित होते. (Latest Marathi News)

यावेळी भालके म्हणाले, सुरवातीच्या काळात रिडालोसबद्दल राज्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या, त्याच भावना आज आहेत. पण ज्या मतदारांनी ३८ हजारांचे मताधिक्य देत विधानसभेत पाठवले, कागदावर नसलेले दोन टीएमसी पाणी प्रत्यक्षात कागदावर आणले, पाण्यासाठी तीन महिने मतदार व कुटुंबापासून दूर जात बहिणीच्या अंत्यविधीलाही न येता भारतनानांनी पाण्याला मंजुरी आणली. स्व. नाना कोणत्याही पक्षात असले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर श्रद्धा ठेवली.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जिल्ह्यात कुणीही विरोधी भूमिका मांडल्यास पहिल्यांदा त्यावर प्रत्युत्तर देण्याचे काम नानांनी केले. त्यामुळे अडचणीच्या काळात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आधार, आपुलकी आणि प्रेमाची गरज होती. प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याला मदत मागितली, पण ही मंडळी मदत करू शकली नाहीत. एमएससी बँकेचा प्रमुख सरकारचा ऐकत नाही.(Latest Marathi News)

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माझ्याशी सातत्याने संपर्कात राहून आधार देण्याचे काम केले. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. या ताकदीनंतरच मी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि हे मी मोकळे बोलत नाही, ते तुम्हाला त्या निवडणुकीत दिसून येईल.(Latest Marathi News)

यावेळी नितीन पाटील, गुलाब थोरबोले, सिद्धेश्‍वर दसाडे, मनोहर कवचाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी सभापती संभाजी गावकरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समय रैनाच्या विनोदावरून नवा वाद! मुस्लिम समुदायाचा उल्लेख करताच मौलाना संतापले, हुमा कुरेशीचं काय कनेक्शन?

Sinhgad Institute : पुणे महापालिकेचा सिंहगड शिक्षण संस्थेला दणका; २९५ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याचा प्रस्ताव

‘CSMT स्थानकात स्फोट होणार…’ पोलिसांना फोनवरुन धमकी; तीन तास शोधमोहीम, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

U19 Asia Cup India Win: 'कमालीची फिनिश...' लेक आर्यवीरसह युवा टीम इंडियाचं सेहवागकडून भरभरून कौतुक; सचिन, गांगुलीकडूनही शाबासकी

Latest Marathi News Live Update : 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाला दणका देणार

SCROLL FOR NEXT