Bharat Gogawale on sunil tatkare esakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Gogawale : ''राजकारणात काहीही होऊ शकतं'', अदिती अन् सुनील तटकरेंच्या भेटीनंतर गोगावले थेटच बोलले...

संतोष कानडे

मुंबईः सरकार स्थापनेपासून मंत्रिपदासाठी आणि पर्यायाने पालकमंत्रीपदासाठी इच्छूक असलेले भरत गोगावले यांनी सोमवारी सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांची भेट घेतली. अदिती तटकरे यांनी सरकारमध्ये उशिराने येऊनसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र गोगावलेंना अद्याप प्रतीक्षा आहे.

रायगडमध्ये कायम विरोधात राहिलेले सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांचीदेखील उपस्थिती होती. सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावले आमनेसामने आलेले आहेत. त्यात ही भेट विशेष महत्त्वाची मानली जातेय.

आदिती तटकरे यांना भरत गोगावलेंच्या विरोधामुळे पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागलं आहे. ते पद आपल्यासाठी राखून ठेवलंय असं विधान गोगावलेंनी पालकमंत्री पदांच्या वाटपानंतर केलं होतं. दरम्यान, सोमवारी सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

भरत गोगावले हे सोमवारी सायंकाळी 7.15 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन पक्ष कार्यालयात पोहोचले होते. तटकरे आणि गोगावले वाद सर्वश्रुत आहेत, त्यातच आता गोगावले तटकरेंच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बैठकीनंतर रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का, हे पाहणं महत्वाचं आहे.

भेटीनंतर गोगावले काय म्हणाले?

रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या आम्ही एकत्र लढणार आहोत, त्यामुळे एक बैठक व्हायला हवी यासाठी भेट घेतली. पालकमंत्री पदाबाबत कोणतीच चर्चा झालेली नसून त्यांनीदेखील पालकमंत्री पदाबाबत काहीच विचारलं नाही. आमचे वाद हे राजकीय आहेत, वैयक्तिक नाहीत.. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं, असं शेवटी गोगावले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT