भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे संजय कदम Sakal
महाराष्ट्र बातम्या

भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे संजय कदम यांची बंद खोलीत खलबते

मुझफ्फर खान

चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनी खेड (Khed) दौऱ्यावर असताना आज त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र समजू शकलेले नाही. पण या भेटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह खेड व गुहागर तालुक्यात राजकीय चर्चा, तर्कवितर्क सुरू झालेत. आमदार भास्कर जाधव आज खेड येथे रुग्णवाहिक लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी ही भेट घेतली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना बुके देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी संजय कदम यांचे मोठे बंधू सतीश कदम हेही उपस्थित होते.

आमदार जाधव यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी मध्ये असताना माजी आमदार संजय कदम हे एकेकाळी त्यांचे उत्तम जवळचे सहकारी ओळखले जात होते. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेत गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या दोन कुणबी समाजातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला थेट आव्हान दिले. यामध्ये एका कुणबी नेत्याला विधानपरिषदेवर विचार करु असा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये एक स्थानिक नेता नाराज असल्याची कुजबुज गेले काही दिवस सुरू आहे.

दरम्यान खासदार सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांचे असलेले शीतयुद्ध जिल्ह्यात माहीत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे विद्यमान भास्कर जाधव यांच्या भेटीला कमालीच महत्व प्राप्त झाले आहे . कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत त्यामुळे या भेटीमुळे जिल्हयातील राजकारणात चर्चा रंगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT