sharad pawar bhaskar jadhav 
महाराष्ट्र बातम्या

भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष? शरद पवारांनी केलं स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबत आमच्या तिन्ही पक्षांचा निर्णय स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवील ती व्यक्ती अध्यक्ष होईल

माळेगाव- भास्कर जाधवांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचे वेध लागल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, `` विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबत आमच्या तिन्ही पक्षांचा निर्णय स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवील ती व्यक्ती अध्यक्ष होईल. काँग्रेस पक्ष दिल्या त्या व्यक्तीला आमच्या तिन्ही पक्षाची मान्यता असेल.''(bhaskar jadhav will be speaker legislative assembly said ncp sharad pawar)

नाना पटोले स्वबळाची भाषा करतात, यावर पवार म्हणाले, की राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे राज्यातील प्रमुख पक्ष आहेत. प्रत्येक पक्ष आपले बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणारच आहेत. त्यात काही चुकीचे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवितो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवतो असा नाही. प्रत्येकाला आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढावी, अशी इच्छा असणे गैर नाही. परंतु सरकार चालवीताना एक विचार आहे की नाही, हे जर विचारले तर ते आहेत, असेच मी म्हणेन, असं पवार म्हणाले.

गोंधळ घातल्यानंतर शिक्षा होणारच की...

नुकतेच विधान सभेत भाजपच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक गोंधळ झाला, आता आपण त्यावर काय बोलणार. संबंधितांना १ वर्ष निलंबित केले आहे. ज्यांनी चुकीचे काम केले त्यांना शिक्षा ही होणारच की, असे स्पष्ट मत व्यक्त करीत शरद पवार यांनी १२ आमदारांच्या निलंबन कारवाईचे समर्थन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

SCROLL FOR NEXT