महाराष्ट्र बातम्या

दया नायक यांच्या पथकाची मोठी कारवाई! १६ कोटींचे घातक ‘MD’ ड्रग्ज मुंबईत पकडले; सोलापुरातील दोघांना पोलिस कोठडी

मुंबईत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकाने जेरबंद केले. या पथकाचे प्रमुख तथा इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मोहोळजवळील चिंचोली एमआयडीसीतील एका फॅक्टरीवर मुंबई क्राईम ब्रॅंचच्या ९ नंबर पथकाने धडक कारवाई करीत त्या कंपनीला सील ठोकले आहे. मुंबईत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकाने जेरबंद केले. या पथकाचे प्रमुख तथा इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने बंदी घातलेले एमडी हे केमिकल ड्रग्ज आरोग्यासाठी फार घातक मानले जाते. मुंबई क्राईम ब्रॅंचने त्याठिकाणी राहुल किसन गवळी व अतुल किसन गवळी यांच्या ताब्यातून आठ किलो म्हणजेच अंदाजे १६ कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले, त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. दरम्यान, त्या दोघांनाही मुंबईतून अटक केल्यानंतर रविवारी (ता. १५) क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी मोहोळ येथे येऊन चिंचोली एमआयडीसीतील या कंपनीला सील ठोकले आहे. सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांना कोणताही माहिती न देता मुंबईच्या क्राईम ब्रॅंचच्या ९ नंबर पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, आता ते कधीपासून अनधिकृत ड्रग्ज तयार करीत होते, त्यांनी कोठे-कोठे त्याची विक्री केली आहे, याचा सखोल तपास सुरु आहे.

ठळक बाबी...

  • - मुंबई क्राईम ब्रॅंचच्या ९ नंबर पथकाने केली ही धडक कारवाई

  • - ‘एमडी’ ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईत आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

  • - न्यायालयाने दोघांनाही ठोठावली १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

  • - सोलापूरमधील राहुल किसन गवळी व अतुल किसन गवळी यांना अटक केल्याची पोलिसांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT