MPSC.jpg 
महाराष्ट्र बातम्या

'एमपीएससी'चे मोठे निर्णय! राज्यसेवा पूर्व परीक्षेचे केंद्र बदलण्यास मुदतवाढ अन्‌ दुसरा निर्णय... 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्‍टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तर 20 सप्टेंबरला होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आयोगाने 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

जिल्हा केंद्र निवड न करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी भरलेल्या त्यांच्या अर्जातील कायमस्वरुपी रहिवासीचा पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करु न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल, दूरध्वनी क्रमांकावर लघुसंदेश दिला जाणार असून व्यवस्थेप्रमाणे निवडण्यात आलेल्या जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती यापुढे कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. 


विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेतले निर्णय 
राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने आता सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. 
- सुनिल आवताडे, सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

ठळक बाबी... 

  • राज्यसेवेची दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्‍टोबर (रविवारी) रोजी घेण्याचे आहे प्रस्तावित 
  • लॉकडाउनमुळे बहुतांश विद्यार्थी गेले त्यांच्या मूळगावी; त्यांच्या सोयीसाठी आयोगाने बदलला निर्णय 
  • सद्यस्थितीत प्रवासावरील व तात्पुरत्या वास्तव्यावरील निर्बंध पाहून आयोगाने सर्वच उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची दिली संधी 
  • 21 ऑगस्टपासून दुपारी दोन ते 26 ऑगस्टपर्यंत रात्री 23.59 वाजेपर्यंत निवडता येणार परीक्षा केंद्र 
  • जिल्हा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश द्यावयाची कमाल क्षमता निश्‍चित करुन प्रथम येणाऱ्यास राहणार प्राधान्य 
  • संबंधित जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रवेशाची निश्‍चित केली आहे कमाल क्षमता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT