
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघात कसोटी मालिकेा होत असून या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार विआन मुल्डरने गाजवला आहे. बुलावायो येथे होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत अष्टपैलू मुल्डरने त्रिशतकी खेळी करता अनेक विक्रम मोडले आहेत.
या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने तेंबा बावूमा, एडेन मार्करमसह अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे केशव महाराजने पहिल्या सामन्यात नेतृत्व केले होते, तर रविवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत मुल्डर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे.