MNS Pune Esakal
महाराष्ट्र बातम्या

MNS Pune : वसंत मोरेंना पुन्हा धक्का! मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी

पुन्हा एकदा मनसे मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यानंतरही मनसे पक्षातील अंतर्गत वाद आणि नाराजीचे सुर दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) मनसेप्रमुख राज ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांनी पदावरुन हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मनसे मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश माझिरे नाराज असल्याच्या आणि पक्ष सोडल्याच्या असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याच काळात मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे आणि निलेश माझिरे यांनी शिवतीर्थवर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे सोडलेल्या निलेश माझिरेंची समजूत काढली होती. त्यानंतरच त्यांना पुणे जिल्हा माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते. निलेश माझिरे जिल्हाध्यक्षपदाला स्थानिक नेते विरोध करत असल्याने निलेश माझिरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

वसंत मोरेही मनसेवर नाराज असल्याच्या चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेला वसंत मोरेंनी विरोध दर्शवला होता. वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे आणि पुण्यातील मनसेचे नेते नाराज झाले होते. परंतु तेव्हाही वसंत पक्षासोबत असल्याचं बोलले होते. त्यानंतर अलीकडेच वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची भेट घेतली. तर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT