mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यात 100 रोजगार मेळावे; 1,00000 तरूणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट; शासकीय रिक्त पदे भरतीचेही नियोजन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात १०० रोजगार मेळावे (प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन मेळावे) घेतले जाणार आहेत. या मेळाव्यांमधून सुमारे एक लाख सुशिक्षित तरूण-तरूणींना रोजगार तथा नोकरी देण्याचे नियोजन आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात १०० रोजगार मेळावे (प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन मेळावे) घेतले जाणार आहेत. या मेळाव्यांमधून सुमारे एक लाख सुशिक्षित तरूण-तरूणींना रोजगार तथा नोकरी देण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे आगामी तीन महिन्यात (३१ ऑगस्टपूर्वी) विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीचेही नियोजन करण्यात आले आहे.

मागील नऊ वर्षांत राज्यातील तीन लाख तरूणांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या, पण २०१४-१५ ते २०१८-१९ च्या तुलनेत पुढील साडेचार वर्षांत रोजगार मेळावे व नोकरी मिळालेल्या तरूणांची संख्या निम्म्याने कमी झाल्याची स्थिती आहे. २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षांत ८६१ रोजगार मेळाव्यांमधून राज्यातील केवळ ९१ हजार तरूणांना नोकरी तथा रोजगार मिळाला. तत्पूर्वी, २०१४ ते २०१९ या काळात अकराशे रोजगार मेळाव्यांमधून राज्यातील दोन लाख तरूणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात (जून, जुलै ते ऑगस्टपर्यंत) किमान तीन रोजगार मेळावे होतील आणि त्यातून राज्यातील एक लाख तरूण- तरूणींना नोकऱ्या मिळतील, असे नियोजन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यासंबंधीचे निर्देश दिल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत ‘बेरोजगारी’ हा विषय राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरणार नाही, हा त्यामागील हेतू असल्याचेही बोलले जात आहे.

ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तीन मेळाव्यांचे नियोजन

जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित तरूणांना रोजगार तथा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने ३१ ऑगस्टपर्यंत किमान तीन रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्यांचे नियोजन होईल.

- हणुमंत नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर

चार वर्षांतील रोजगार मेळावे अन्‌ नोकऱ्यांची स्थिती

  • साल मेळावे रिक्त जागा नोकरी मिळालेले

  • २०१९-२० १४८ ८४,८७५ २२,८७७

  • २०२०-२१ १९४ १,८०,३०४ २८,८१२

  • २०२१-२२ २०२ ९३,६५२ ९,५९५

  • २०२२-२३ ३१७ २,३०,७४८ २९,८७०

  • एकूण ८६१ ५,८९,५७९ ९१,१५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT