अभियांत्रिकी प्रवेश Esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांची ६५ वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण झाली. मात्र, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) मान्यतेसाठी अर्ज करण्याची मुदत शासन निर्णयापूर्वीच संपली. त्यामुळे सोलापूरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यंदा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांची ६५ वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण झाली. मात्र, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) मान्यतेसाठी अर्ज करण्याची मुदत शासन निर्णयापूर्वीच संपली. त्यामुळे सोलापूरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यंदा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढच्या वर्षीच या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांतील तरुण-तरुणींचे अभियांत्रिकीचे स्वप्न पूर्ण व्हावे, या हेतूने राज्य सरकारने सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी दिली. सोलापुरातील शांती चौक (अक्कलकोट रोड) परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेत हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने नव्याने नियमित शिक्षकांची ३९ आणि शिक्षकेतर ३८ पदे (यापैकी २२ नियमित व १६ बाह्य यंत्रणेद्वारे) निर्माण केली जाणार आहेत.

संस्थेतील नवीन शिक्षक व शिक्षकेतर पदांवरील खर्च तसेच बांधकाम, यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी आगामी चार वर्षांत सुमारे १५७ कोटी ६६ लाख दोन हजार रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीसही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सध्या इमारत दुरुस्ती, डागडुजी व अन्य आवश्यक खर्चासाठी ११ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासही मान्यता मिळाली आहे. पण, यावर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास ‘एआयसीटीई’ची मान्यता मिळणार नसल्याने तुर्तास पदभरती, इमारतीची डागडुजी व अन्य कामे पूर्ण केली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एआयसीटीई’कडे पाठपुरावा सुरू, पण...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘एआयसीटीई’चे वेळापत्रक दरवर्षी निश्चित केले जाते. त्यानुसार एप्रिलअखेर मान्यतेसंबंधीचे त्यांचे पोर्टल बंद झाले होते. राज्य शासनाने सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी दिली असून ते यावर्षीच सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ‘एआयसीटीई’ची मुदत संपल्याने यंदा मान्यता न मिळाल्यास पुढच्या वर्षी निश्चितपणे सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

- डॉ. विनोद मोहितकर, संचालक, उच्च व तंत्रशिक्षण

मंत्रिमंडळाची मंजुरी ५ मे रोजी अन्‌ ‘एआयसीटीई’ची मुदत संपली ३० एप्रिलला

सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास राज्य शासनाने ५ मे रोजी मंजुरी देत त्याबाबतचा शासन निर्णयही काढला. मात्र, त्या महाविद्यालयाला मान्यता देण्याची ‘एआयसीटीई’ची मुदत ३० एप्रिललाच संपली होती. आता राज्य शासनाने ‘एआयसीटीई’कडे पत्रव्यवहार करून मुदतवाढीची विनंती केली आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने ‘एआयसीटीई’चे वेळापत्रक निश्चित केल्याने आता त्यात बदल करणे कठीण आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस मान्यता देण्याची कार्यवाही पुढच्या वर्षीच होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT