State Election Commission

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ३१ जानेवारीपूर्वीच संपणार निवडणुका; दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक, १० डिसेंबरला होणार मतदार यादी अंतिम; पुढचे दोन टप्पे असणार असे...

राज्यातील दोन महापालिका व १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले. त्याची घोषणा १५ ते १७ डिसेंबर दरम्यान होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील २७ पैकी दोन महापालिका व ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही. आरक्षणाचा घोळ सध्या सुरु असला, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले असून त्याची घोषणा १५ ते १७ डिसेंबर दरम्यान होऊ शकते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

चंद्रपूर व नागपूर महापालिकेच्या आरक्षणात ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. याशिवाय राज्यातील १७ जिल्हा परिषदांसह तीन जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्येही अशीच कार्यवाही झाली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाही असे आदेश दिले आहेत. ५० टक्क्यांची मर्यादा पालन केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणताही अडथळा नाही. मात्र, १७ जिल्हा परिषदांची निवडणूक मागे ठेवून १५ जिल्हा परिषदांची निवडणूक घेता येत नाही.

त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियाजन केले आहे. मात्र, त्यासाठी १० डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्या दिवशी महापालिकांची वॉर्डनिहाय मतदार यादी अंतिम होणार आहे. आयोगाकडून १० डिसेंबर रोजी त्यासंदर्भात आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाईल, असे आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

आयोगाला प्रतीक्षा ‘सर्वोच्च’ मार्गदर्शनाची...

राज्यातील १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण असलेल्या ठिकाणच्या निवडणुका घ्यायला परवानगी दिली आहे. पण, मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी नव्याने आरक्षण काढा किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले नाही. त्यामुळे या १७ जिल्हा परिषदांमध्ये ओलांडलेल्या आरक्षण मर्यादेसंदर्भात नेमकी काय कार्यवाही करावी, यावर सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन मागविल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. याच आठवड्यात त्यावरील आदेश प्राप्त होतील, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

४६ दिवसांतील संभाव्य दोन टप्पे...

  • महापालिका

  • २९

  • कालावधी

  • १५ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत

  • झेडपी, पंचायत समित्या

  • ३२ (३३१)

  • कालावधी

  • ५ ते ३१ जानेवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT