‘महावितरण’
कडून 
वीजपुरवठा
 खंडित
‘महावितरण’ कडून वीजपुरवठा खंडित Sakal
महाराष्ट्र

मोठी बातमी! सोलापुरातील ‘या’ २ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडीत; ७८००० रुपयांच्या अनुदानातून सोलर बसवा, वीजबिलापासून मुक्ती मिळवा

तात्या लांडगे

सोलापूर : थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे ‘महावितरण’कडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ४५ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यात आता सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ग्राहक महावितरणच्या रडावर आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १४ लाख १६ हजार ३०० ग्राहकांकडे २५४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार ९१५ ग्राहकांकडे ३१ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे गेल्या महिन्याभरात सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार १५४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. आर्थिक अडचणीतील ‘महावितरण’ने थकीत रक्कम किती आहे हे न पाहता आता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु केली आहे.

थकबाकीदारांनी www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच ‘महावितरण’च्या मोबाइल अॅपद्वारे वीजबिल भरावे. थकबाकी न भरल्यास ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना उकाड्याचा त्रास सोसावा लागणार आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध असल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.

रुफ टॉप सोलरमुळे वीजबिलापासून मुक्ती

केंद्र सरकारकडून ग्राहकाला एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान आहे. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. ‘पीएम सूर्यघर’ ॲप मोबाईलमध्येउपलब्ध आहे. एक किलोवॅटच्या रूफ टॉप सोलरमधून दररोज चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना १५० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची सोलर सिस्टिम पुरेशी आहे. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्याने वीजबिल शून्य येते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT