solapur midc

 

solapur

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! बोरामणी विमानतळाच्या १,४३७ एकरांवर आता ‘एमआयडीसी’चा डोळा; ‘माळढोक’मुळे विमानतळ रखडले; वन विभागाच्या अंतिम भूमिकेनंतर MIDC मागणार जागा

१७ वर्षांपासून ‘लवकरच विमानतळ’ या आश्वासनावर थांबलेल्या बोरामणी प्रकल्पाला आता नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. ‘माळढोक’ संवर्धनामुळे विमानतळासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची जमीन संपादित होऊ शकलेली नाही. त्यामुळे तब्बल १,४३७ एकर संपादित जमीन आता एमआयडीसीकडे वळवण्याची तयारी सुरू झाली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : १७ वर्षांपासून ‘लवकरच विमानतळ’ या आश्वासनावर थांबलेल्या बोरामणी प्रकल्पाला आता नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. ‘माळढोक’ संवर्धनामुळे विमानतळासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची जमीन संपादित होऊ शकलेली नाही. त्यामुळे तब्बल १,४३७ एकर संपादित जमीन आता एमआयडीसीकडे वळवण्याची तयारी सुरू झाली आहे. वन विभागाच्या अंतिम निर्णयानंतर राज्य सरकारकडे औपचारिक मागणी होण्याची शक्यता असून, सोलापूरला विमानतळाऐवजी मोठी औद्योगिक संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नांतून सोलापूर-हैदराबाद रोडवर बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. २००९ पासून भूसंपादनही सुरू झाले. आतापर्यंत ५७५ हेक्टर जमीन संपादित झाली, मात्र प्रस्तावित विमानतळाच्या मध्यभागातील ३३.७२ हेक्टर जमीन संपादनास ‘माळढोक’चा अडथळा आहे. त्या जमिनीच्या संपादनासाठी पाठविलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाने यापूर्वीच फेटाळला. दुसऱ्याच वर्षीपासून भूसंपादन सुरू झाले. २०२३ पर्यंत विमानतळासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून तब्बल १,४३७ एकर जमीन संपादित करण्यात आली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी दिला होता. मात्र, माळढोकसाठी आरक्षित ३३.७२ हेक्टर जमीन विमानतळासाठी मिळालीच नाही आणि ती जमीन नेमकी धावपट्टीच्या मध्यभागात आहे. १७ ते १८ वर्षांपूर्वी निर्णय होऊनही बोरामणीचे विमानतळ अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे ही जागा एमआयडीसीसाठी मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्राच्या समितीचे स्पष्ट मत असे...

वन आरक्षित जागा एखाद्या प्रकल्पासाठी देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. ५० हेक्टरच्या आतील जमिनीसाठी नागपूर येथील कार्यालयाकडे, तर ५० हेक्टरवरील जमिनीसाठी भोपाळ येथील कार्यालयाकडे प्रस्ताव द्यावा लागतो. सोलापूरमधील बोरामणी विमानतळासाठी वन विभागाच्या माळढोक क्षेत्रातील ३३.७२ हेक्टर जमीन आवश्यक आहे. ती जमीन विमानतळाच्या धावपट्टीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या जमिनीसाठी नागपूर येथील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याच ठिकाणी पर्यायी जमीन देण्याचाही त्यात उल्लेख होता. मात्र, या जमिनीवर माळढोकचे वास्तव्य असून हा पक्षी दुर्मिळ झाल्याने त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही जागा विमानतळासाठी देता येणार नाही, असे नागपूरच्या समितीने स्पष्ट केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

रोड कनेक्टिव्हीटीमुळे ‘एमआयडीसी’ला जागेची अपेक्षा

बोरामणी विमानतळासाठी ५०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित झाली आहे. पण, अनेक वर्षांपासून वन विभागाच्या निकषांमुळे धावपट्टीसाठी लागणारी जागाच विमानतळासाठी मिळू शकलेली नाही. आता येथून नाशिक-अक्कलकोट-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे जात असून, बाजूने सोलापूर-हैदराबाद रोड गेलेला आहे. त्यामुळे महामार्गांची कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने तेथे मोठी एमआयडीसी उभारल्यास सोलापूरातील हजारो तरुणांना रोजगार मिळेल.

- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिंचोळी एमआयडीसीतील अवैध दारूच्या फॅक्टरीचा मालक बार्शीचा! जूनमध्ये बंद मिल्क प्रॉडक्टची जागा ‘होमनेट’साठी केली ट्रान्स्फर, पोखरापूरच्या बापू भोसलेच्या मदतीने टाकला तिसराच उद्योग, वाचा...

Potato Egg Salad: फक्त बटाटे, अंडी आणि दही... 10 मिनिटांत तयार करा Viral Potato Egg Salad; नाश्त्यासाठी प्रोटीनयुक्त आणि टेस्टी रेसिपी

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

SCROLL FOR NEXT