Housing Cooperative Society

 

Sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आता एका अर्जावर स्थापन करता येईल सहकारी गृहनिर्माण सोसायटी; ‘बिल्डर’ने नकार दिल्यानंतरही सभासदांसाठी ‘हा’ पर्याय खुला, वाचा...

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले, सर्व फ्लॅटधारक राहायला आले, आता गृहनिर्माण सोसायटी स्थापन करायची आहे, पण बिल्डर त्यासाठी परवानगी देत नाही. अशा असंख्य तक्रारी त्या इमारतीतील सभासद करतात. अशावेळी तेथील एकूण सभासदांपैकी ५१ टक्के सभासद मिळून सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करता येते. पण, त्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधकांकडे एक अर्ज करून तशी मागणी करणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले, सर्व फ्लॅटधारक राहायला आले, आता गृहनिर्माण सोसायटी स्थापन करायची आहे, पण बिल्डर त्यासाठी परवानगी देत नाही. अशा असंख्य तक्रारी त्या इमारतीतील सभासद करतात. अशावेळी तेथील एकूण सभासदांपैकी ५१ टक्के सभासद मिळून सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करता येते. पण, त्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधकांकडे एक अर्ज करून तशी मागणी करणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात.

गृहनिर्माण सोसायटीसाठी किमान पाच सभासद आवश्यक असतात. दरम्यान, फ्लॅट खरेदीनंतर सर्वजण त्या इमारतीत राहायला जातात. त्यावेळी अपार्टमेंट डीड, कंपनी ॲक्ट किंवा सहकारी गृहनिर्माण सोसायटी असे तीन पर्याय त्या फ्लॅटधारकांसमोर असतात. ‘अपार्टमेंट डीड’नुसार त्या इमारतीतील फ्लॅट प्रत्येकाच्या नावे होतात, पण मूळ जमीन तथा जागा बिल्डरच्याच नावे राहते. त्यामुळे काही बिल्डर तेथील फ्लॅटधारकांच्या संमतीशिवाय परस्पर इमारतीचे मजले वाढवितात. बांधकाम पूर्ण झाल्यावर इमारतीची देखभाल-दुरस्ती वेळेत व व्यवस्थित केली जात नाही. काही वर्षांनंतर इमारतीतील सर्वांना मिळून पुनर्विकास करायचा असल्यास बिल्डरच्या नावे जागा असल्याने पुनर्विकासाला अडचणी येतात.

ज्यावेळी सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन होते, त्यावेळी इमारतीची जागा संस्थेच्या नावे करावी लागते. तेथील व्यावसायिक गाळे, पार्किंगचाही निर्णय सोसायटीलाच असतो. दरम्यान, ज्यावेळी सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन होते, त्यावेळी बिल्डरला इमारतीचे मजले वाढविण्यासाठी सोसायटीची परवानगी घ्यावी लागते. दुसरीकडे सोसायटी नसल्यास बिल्डर स्वत: नगरपालिका, महापालिका प्रशासनाकडून परवानगी घेऊन इमारतीचे मजले वाढवू शकतो. पार्किंग, व्यावसायिक गाळे स्वत:च्या मर्जिप्रमाणे कोणालााही देऊ शकतो. त्यामुळे काही बिल्डर गृहनिर्माण सोसायटीऐवजी अपार्टमेंटसाठीच आग्रही असतात.

‘रेरा’ कायद्यातील तरतुदीनुसार बिल्डरला इमारतीची मूळ जागा हस्तांतरण करणे बंधनकारक नाही. परंतु, ज्यावेळी प्रकल्प पूर्ण होईल, त्यावेळी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करुन सभासद ती जागा सोसायटीच्या नावे करु शकतात, असेही अधिकारी सांगतात.

सुनावणीअंती घेतला जातो निर्णय

एखादा बिल्डर सभासदांच्या विरोधात भूमिका घेत असेल आणि गृहनिर्माण सोसायटी स्थापन करायला विरोध करीत असल्यास सभासदांना आमच्याकडे अर्ज करता येतो. त्यावेळी दोन्ही बाजूंना आपापले म्हणणे मांडायला संधी दिली जाते. सुनावणीअंती निर्णय घेतला जातो.

- किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

सोलापूर शहरातील स्थिती

  • एकूण गृहनिर्माण सोसायट्या

  • ४०७

  • एकूण सभासद

  • १०,१००

  • सोसायटींचे सरासरी सदस्य

  • २५

  • सोसायटीसाठी किमान सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatraati Sambhajinagar: शहरात फक्त चार दिवसांचा रक्तसाठा; टंचाईने जीव टांगणीला, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची वेटिंग

Latest Marathi News Live Update : जलविद्युत प्रकल्पांचा महाराष्ट्रात ‘महापूर’

Pune: सनसिटी-कर्वेनगर पुलाचे काम कासव गतीने; सिंहगड रस्ता परिसरात कोंडीचा पेच कायम, नागरिकांमध्ये नाराजी

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

SCROLL FOR NEXT