government scheme

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आता बॅंकेत त्याच दिवशी क्लिअर होणार धनादेश (चेक); ‘आरबीआय’चे सर्व बॅंकांना परिपत्रक; खात्यात पैसे ठेवूनच द्यावा लागणार त्या तारखेचा चेक

रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांमध्ये खातेदारांनी टाकलेल्या धनादेशासंदर्भात नवे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार खातेदाराने बॅंकेत जमा केलेला धनादेश त्याच दिवशी क्लिअर होणार आहे. त्यामुळे खातेदारांना त्यांच्या खात्यात पैसे ठेवूनच आता समोरील व्यक्ती, संस्थांना धनादेश द्यावा लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांमध्ये खातेदारांनी टाकलेल्या धनादेशासंदर्भात नवे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार खातेदाराने बॅंकेत जमा केलेला धनादेश त्याच दिवशी क्लिअर होणार आहे. त्यामुळे खातेदारांना त्यांच्या खात्यात पैसे ठेवूनच आता समोरील व्यक्ती, संस्थांना धनादेश द्यावा लागणार आहे.

बॅंकेत जमा केलेला धनादेश न वटल्यास (बाऊन्स) भारतीय कायद्यानुसार दंड आणि कारावास होऊ शकतो. जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत येतो. ही शिक्षा धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंड, दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही स्वरूपाची कारवाई होऊ शकते. चेक बाऊन्स टाळण्यासाठी खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे आणि दिलेली माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे. १५ दिवसांत पैसे न भरल्यास, धनादेश देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

आता तर आरबीआयच्या नव्या परिपत्रकानुसार जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कार्यवाही सुरू केली आहे. आता नागरी बॅंकांमध्ये देखील आरबीआयच्या परिपत्रकानुसार ४ ऑक्टोबरपासून कार्यवाही सुरू होणार आहे. धनादेश ज्या तारखेचा त्या दिवशी न वटल्यास बॅंकेकडून किमान ५०० रुपये दंड होऊ शकतो. आता या दंडातही वाढ होण्याची शक्यता आहे.

बॅंकांकडून ग्राहकांना असा मेसेज

‘आरबीआय’च्या परिपत्रकानुसार ४ ऑक्टोबरपासून क्लिअरिंगची अखंडित सेवा सुरू होणार आहे. आपण भरलेल्या धनादेशाचे पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होणार आहेत. तसेच आपण दिलेल्या धनादेशातील रक्कम त्याच दिवशी समोरील खातेदाराच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे खात्यावर पुरेशी शिल्लक ठेवूनच धनादेश द्यावा आणि धनादेश परतीचा दंड टाळावा.

‘आरबीआय’च्या परिपत्रकानुसार बॅंकांकडून कार्यवाही

रिझर्व्ह बॅंकेने धनादेशासंदर्भात दिलेल्या सूचना, परिपत्रकानुसार सर्व बॅंकांकडून कार्यवाही केली जात आहे. धनादेशाद्वारे व्यवहार करणाऱ्यांनी आधी स्वत:च्या बॅंक खात्यात रक्कम असल्याची खात्री करूनच समोर धनादेश द्यावेत.

- राम वाखरडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates : कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगाकडून झालेली एक गंभीर चूक निदर्शनास आणून दिली - अनिल देसाई

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT