mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! झेडपी, मनपा, नगरपालिकांच्या शाळांमध्ये नेमले जाणार अंशकालीन निदेशक; दरमहा १८ हजार मानधन; शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार; पटसंख्येची अट अशी...

जिल्हा परिषद, महापालिका किंवा नगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवी किंवा ज्या शाळा सातवीपर्यंतच आहेत, तेथे इयत्ता सहावी- सातवीच्या वर्गाचा पट १०० आवश्यक आहे. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळांची पटसंख्या निश्चित झाली आहे. त्यानुसार पटसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या त्या शाळांच्या मुख्याध्यापकास अंशकालीन निदेशक भरण्यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद, महापालिका किंवा नगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवी किंवा ज्या शाळा सातवीपर्यंतच आहेत, तेथे इयत्ता सहावी- सातवीच्या वर्गाचा पट १०० आवश्यक आहे. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळांची पटसंख्या निश्चित झाली आहे. त्यानुसार पटसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या त्या शाळांच्या मुख्याध्यापकास अंशकालीन निदेशक भरण्यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतर प्राप्त अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. आता आगामी शैक्षणिक वर्षात पटसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना तीन अंशकालीन निदेशक नेमता येणार आहेत.

पटसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव अशा तीन विषयांचे अंशकालीन निदेशक नेमता येतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याची जाहिरात प्रसिद्ध करायची. त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी व पडताळणी केंद्रप्रमुख करतील. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने त्या अंशकालीन निदेशकांची नेमणूक होईल. शेवटी शासन मान्यतेवर अवलंबून असल्याचे नमूद करून गटशिक्षणाधिकारी संबंधित अंशकालीन निदेशकांना आदेश देतील. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या अंशकालीन निदेशकांची नावे शासनाला पाठविली जातात. त्यानुसार त्यांना दरमहा मानधन सुरू होते. राज्यभरात साडेचार हजारांपर्यंत अंशकालीन निदेशक आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढलेल्या शाळांमध्ये आणखी त्यांची संख्या वाढणार आहे.

निदेशकांना दरमहा शासनाकडून मानधन

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये अंशकालीन निदेशक नेमता येतो. याचे संपूर्ण अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहेत. यासाठी सहावी ते आठवीच्या वर्गाचा पट किमान शंभर असणे अपेक्षित आहे. या अंशकालीन निदेशकांना शासनाच्या माध्यमातून दरमहा मानधन दिले जाते.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

दरमहा १८ हजार रुपयांपर्यंत मानधन

शाळांवर नेमलेल्या अंशकालीन निदेशकास ४८ तासांसाठी १२ हजार रुपयांचे मानधन शासनाकडून दिले जाते. त्यापेक्षा जास्त तास झाल्यास ४८ तासांवरील पुढील प्रत्येक तासासाठी २०० रुपयांचे मानधन मिळते. परंतु, दरमहा १८ हजार रुपयांच्या मर्यादेतच त्यांचे मानधन राहील, असा शासन आदेश आहे. पण, दरमहा वेळेत मानधन मिळत नसल्याची खंत अंशकालीन निदेशकांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT