पोलिस भरती Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ महिन्यात; मैदानी चाचणी फेब्रुवारी-मार्चअखेर संपणार, लेखी परीक्षेसाठी १:१० उमेदवारांची निवड, वाचा...

सध्या सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यातील पोलिस भरतीसाठी सुरू असलेली मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेर संपणार आहे. मुंबई, पुण्यातील पोलिस भरतीसाठी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उमेदवारांच्या अर्जांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तेथील मैदानी चाचणीसाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यानंतर साधारणत: एप्रिल महिन्यात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होऊ शकते, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील ७३ पोलिस शिपाई आणि सहा बॅण्ड्‌समन पदांसाठी मैदानी चाचणी पार पडली. ७९ पदांसाठी चार हजार १५१ उमेदवारांनी अर्ज केले होते. पण, मैदानी चाचणीवेळी एक हजार ४४५ तरुण-तरुणी आल्याच नाहीत. दोन हजार ७०६ पैकी १६५५ उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ९० जागांसाठी सुरु असलेली मैदानी चाचणी १७ फेब्रुवारीला संपणार आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेर संपणार आहे.

सोलापूर शहर पोलिस दलातील ७९ पदांसाठी ११ ते १४ फेब्रुवारी या काळात मैदानी चाचणी पार पडली. पोलिस शिपायांच्या ७३ पदांसाठी तीन हजार १३४ उमेदवारांनी अर्ज केले होते. तर बॅण्ड्‌समनच्या सहा जागांसाठी एक हजार १७ उमेदवारांची नोंदणी होती. शिपाई पदाच्या मैदानी चाचणीसाठी २१०० तर बॅण्ड्‌समनसाठी एक हजार १७ उमेदवार आले होते. त्यापैकी २१८ उमेदवार सुरवातीलाच शारीरिक मोजमापात अपात्र ठरले.

तर मैदानी चाचणीवेळी १०० मीटर, १६०० मीटर धावणे आणि गोळाफेकीत ८३३ उमेदवार अपात्र ठरले. आता मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या १६५५ उमेदवारांमधून एका पदासाठी १० उमेदवार असे ७९ पदांसाठी ७९० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. त्यासाठी मेरिट तथा गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ९० पदांसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मैदानी चाचणी चालणार आहे.

एप्रिलमध्ये होईल लेखी परीक्षा

सध्या सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यातील पोलिस भरतीसाठी सुरू असलेली मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेर संपणार आहे. मुंबई, पुण्यातील पोलिस भरतीसाठी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उमेदवारांच्या अर्जांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तेथील मैदानी चाचणीसाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यानंतर साधारणत: एप्रिल महिन्यात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होऊ शकते, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. पोलिस भरतीची लेखी परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी होईल, असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel News: पनवेलच्या कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद, ठाकरे गटाच्या नगरसेविका आक्रमक

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

SCROLL FOR NEXT