zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आगामी भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार नाही एकही शिक्षक; ‘हे’ आहे कारण, डिसेंबरअखेर अंतिम होणार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची संचमान्यता

सोलापूर जिल्ह्यामध्‍ये जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. त्यात सुमारे १५० शाळांची पटसंख्या १० ते २० पेक्षा कमी आहे. आता नव्या शासन निर्णयानुसार संचमान्यता झाल्यानंतर पहिल्यांदाच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्केच पदभरती करता येते. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ९४ टक्के पदे भरलेली आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्‍ये जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. त्यात सुमारे १५० शाळांची पटसंख्या १० ते २० पेक्षा कमी आहे. आता नव्या शासन निर्णयानुसार संचमान्यता झाल्यानंतर पहिल्यांदाच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्केच पदभरती करता येते. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ९४ टक्के पदे भरलेली आहेत. त्यामुळे नव्या शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन एकही शिक्षक मिळणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदांच्या १८ हजार ६०० शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत होती. पण, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेनुसार २० पेक्षा कमी पटाच्या शाळांची संख्या २५ हजारांपर्यंत पोचली. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या १५० हून अधिक शाळा आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटाच्या शाळेवर प्रत्येकी एक नियमित तर २० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी दोन नियमित शिक्षक अपेक्षित आहेत.

मात्र, पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतरही नियमित शिक्षक अपुरे पडल्यास त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. दरम्यान, सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये १५ हजारांपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर रिक्त पदे कमी होतील. समायोजनानंतर रिक्त राहिलेल्या पदांची ८० टक्क्यांच्या प्रमाणात भरती होणार आहे. साधारणत: आठ हजार शिक्षकांची भरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण, त्यात सोलापूर जिल्हा परिषदेला एकही शिक्षक मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

संचमान्यतेनंतर होईल अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता डिसेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुकीची कार्यवाही शासनाच्या आदेशानुसार केली जाईल. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ९४ टक्के पदे भरलेली असल्याने नव्या शिक्षक भरतीत आपल्याला एकही पद भरता येणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक

जिल्हा परिषदांच्या कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे झालेल्या संचमान्यतेनुसार ही कार्यवाही होईल. सेवानिवृत्त शिक्षकास, ज्यांचे वय ७० वर्षांपर्यंत आहे, त्यांना दरमहा २० हजार रुपयांचे मानधन देऊन नेमणूक दिली जाणार आहे. पटसंख्येअभावी सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये देखील अंदाजे ५० कंत्राटी शिक्षक नेमले जातील, अशी सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT