Dal chaval Recipe

 
Esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापुरातील ‘दाल-चावल’ची होणार अचानक तपासणी; अन्न-औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त म्हणाले ‘गाड्यांवर शाकाहारी, मांसाहारीचे फलक बंधनकारक, अन्यथा...’

सोलापूर शहरात २०० हून अधिक हातगाड्यांवर दाल-चावल विकला जातो. मात्र, एकाही गाड्यावर दाल-चावल शाकाहारी की मासांहारी आहे, याचा फलक दिसत नाही. दररोज हजारो सोलापूरकर दाल-चावलचा आस्वाद घेतात, पण त्याची गुणवत्ता तपासली जात नाही. एमआयडीसी पोलिसांत एक गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील दाल-चावल गाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात २०० हून अधिक हातगाड्यांवर दाल-चावल विकला जातो. मात्र, एकाही गाड्यावर दाल-चावल शाकाहारी की मासांहारी आहे, याचा फलक दिसत नाही. दररोज हजारो सोलापूरकर दाल-चावलचा आस्वाद घेतात, पण त्याची गुणवत्ता तपासली जात नाही. एमआयडीसी पोलिसांत एक गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील दाल-चावल गाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर शहरातील कीर्तीनगर येथील एमआयडीसी हद्दीतील एका कार्यक्रमात दिलेल्या दाल-चावलमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी भाजप नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

सोलापूर शहरातील सर्व दाल-चावल विकणाऱ्या गाड्यांची तातडीने तपासणी करावी. मांसाहारी घटक किंवा चरबी वापरणाऱ्यांनी तसे फलक गाड्यांवर लावावेत, अशीही मागणी नगरसेविका वाडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यानुसार आता सोलापूर शहरातील प्रत्येक दाल-चावल गाड्यांची अचानक तपासणी करण्यात येईल, असे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले.

...तर गुन्हा दाखल होईल

दाल-चावल विकणाऱ्याने त्याच्या गाड्यावर किंवा दुकानाबाहेर तो अन्नपदार्थ शाकाहारी की मांसाहारी, याचा फलक लावणे बंधनकारक आहे. त्या पदार्थाची गुणवत्ता दर्जेदार आवश्यक आहे. आम्ही सोलापुरातील दाल-चावल विकणाऱ्या ठिकाणी अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहोत, तसे नियोजन सुरू आहे.

- साहेबराव देसाई, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर

...तर एक लाख रुपयांचा दंड

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मेनू कार्डवर आणि दर्शनी भागात अन्नपदार्थ शाकाहारी की मांसाहारी आहेत, हे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. हा नियम मोडल्यास परवाना रद्द किंवा एक लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसरीकडे अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : शालेय वयातच राष्ट्रसेवेच्या स्वप्नांना मिळणारी दिशा

Protien Rich Soyabean Cutlet: वजन सांभाळायचंय? मग सकाळच्या नाश्त्यात खा हे प्रोटीनयुक्त सोयाबीन कटलेट

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

SCROLL FOR NEXT